formsolution logo
Form Solution

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 गरीबांसाठी व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी

Published on November 16, 2024

नमस्कार आज आपण अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 ही महाराष्ट्र सरकारने मराठा समाजातील तरुणांसाठी सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाच्या तरुणांना सक्षम बनवणे आणि त्यांना रोजगार तसेच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जात.


अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे ?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना म्हणजे, महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देण्याची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे की, बेरोजगारना आर्थिक अडचणींमुळे जे व्यवसाय सुरू करू शकत नाहीत, त्यांना कर्ज देऊन मदत करणे.


कर्जाचे प्रकार

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत, तीन प्रकारचे कर्ज दिले जातात

वैयक्तिक कर्ज व्याज परतफेड योजना – यामध्ये व्यक्तींना कर्ज दिले जाते.
• गट कर्ज व्याज परतफेड योजना – यामध्ये एक गट तयार करून कर्ज दिले जाते.
• गट प्रकल्प कर्ज योजना – यामध्ये गटाच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते.


कर्ज कशासाठी वापरता येईल?

कर्जाची रक्कम व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढील गोष्टींसाठी वापरता येईल:

• दुकान, शाळा किंवा वर्कशॉप सुरू करण्यासाठी पैसे.

• यंत्रसामग्री किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी.

• मालाची खरेदी किंवा इतर आवश्यक खर्चासाठी.


कर्जाची रक्कम आणि व्याजदर खालीलप्रमाणे आहेत:

• कर्जाची रक्कम: पात्र लाभार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

• व्याजदर: कर्जाचा साधारण व्याजदर १२% आहे.

• कर्जाची परतफेड: कर्जाची परतफेड ५ वर्षांच्या कालावधीत केली जाऊ शकते.

• व्याजाची परतफेड: कर्जाच्या व्याजाची रक्कम ३ लाख रुपयांपर्यंत मंडळ द्वारा परत केली जाईल.


वयोमर्यादा:

• पुरुष अर्जदारांसाठी वयोमर्यादा ५० वर्षे आहे.

• महिला अर्जदारांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे आहे.

• वार्षिक उत्पन्न: अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.


आवश्यक कागदपत्रे

योजनेसाठी अर्ज करताना, अर्जदाराला खालील कागदपत्रे आवश्यक असतील:

• आधार कार्ड
• पॅन कार्ड 
• मोबाईल नंबर
• वीज बिल
• पत्ता पुरावा
• ई-मेल आयडी
• प्रकल्प अहवाल (फॉर्म)
• सेल्फ डिक्लरेशन (फॉर्म)
• उत्पन्न प्रमाणपत्र

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा?

• आर्थिक विकास महामंडळ – संबंधित कार्यालयात अर्ज करा.

• ऑनलाइन अर्ज – काही ठिकाणी ऑनलाइन अर्जाची सुविधा देखील आहे.