formsolution logo
Form Solution

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी कशी करावी?

Published on October 16, 2025

मित्रांनो, महाराष्ट्रात पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक चालू आहे. तुम्हीही या खास मतदारसंघात नाव नोंदवायचं असल्यास, खालील पद्धतीने सहजपणे नोंदणी करू शकता.

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी कशी करावी: पायरी-पायरी मार्गदर्शक

महाराष्ट्रात पदवीधर व शिक्षक मतदारसंघात नाव नोंदणी करण्याची पद्धत, पात्रता व आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर मार्गदर्शन.

पात्रता कशी तपासायची?

पदवीधर मतदार

  • भारतीय नागरिक असणे आवश्यक.
  • निवडणूक दिनांकाच्या किमान तीन वर्षे आधी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे.
  • संबंधित मतदारसंघात रहिवासी असणे.
  • फॉर्म क्र. 18 भरा.
  • पदविका (डिप्लोमा) जर पदवीसमान असेल तर तेही स्वीकारले जाईल.

शिक्षक मतदार

  • भारतीय नागरिक असणे आवश्यक.
  • निवडणूक दिनांकाच्या जवळच्या सहा वर्षांत किमान तीन वर्षे पूर्णवेळ माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केलेले असणे.
  • फॉर्म क्र. 19 भरा.

आवश्यक कागदपत्रे

  • रहिवासी पुरावा (पासपोर्ट, वाहन परवाना, टेलिफोन बिल, लाईट बिल इत्यादी).
  • मार्कशीट आणि पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.
  • ओळखपत्र.
  • शिक्षण असल्यास प्राचार्यांचे पत्र किंवा नोकरीचे प्रमाणपत्र.
  • विवाहित असल्यास नाव बदलल्यास राजपत्र अथवा प्रतिज्ञापत्र.
  • पॅन कार्ड.

नोंदणीची प्रक्रिया

ऑनलाइन नोंदणी (mahaelection.gov.in)

  • https://mahaelection.gov.in वर जा.
  • - मोबाईल नंबर टाका, कॅप्चा स्वीकारा व OTP प्रविष्ट करा.
  • - लॉगिन केल्यावर Register for Assembly/Parliament Constituency निवडा.
  • - तुमचा जिल्हा व विधानसभा मतदारसंघ निवडा.
  • - पार्ट नंबर व सिरियल नंबर (मतदान कार्डावरून) व EPIC नंबर भरा.
  • - सर्व तपशील जतन केल्यानंतर Graduate Constituency निवडा.
  • - पर्सनल डिटेल्स, शिक्षण, व्यवसाय व अपंगत्व याबाबत माहिती भरा.
  • - ग्रॅज्युएशन डिटेल्स: विद्यापीठ, पदवी पूर्ण झाल्याची तारीख व वर्ष भरा.
  • - पहिल्यांदा नोंदणी करत असल्यास I have not been included before पर्याय निवडा.
  • - सर्व माहिती तपासून “Save” करा.
  • - डॉक्युमेंट अपलोड: पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर (100KB पेक्षा कमी), पदवी प्रमाणपत्र (200KB पेक्षा कमी PDF) व पत्ता - पुरावा (आधार कार्ड, पासबुक किंवा पासपोर्ट).
  • - सबमिट केल्यावर एक acknowledgement नंबर मिळेल. तो जतन ठेवा.

नंतर होम पेजवर “Check Status” वर जाऊन तुमच्या नोंदणीची स्थिती पाहू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता.

नोंदणी सुरू आहे!

पदवीधर व शिक्षक मतदारसंघात नोंदणी केल्यास तुम्ही आगामी निवडणुकांमध्ये मतदान करू शकता. लवकरात लवकर नोंदणी करा.