बांधकाम कामगारांसाठी नवीन अत्यावश्यक संच (Essential Kit) योजना
Published on October 17, 2025
बांधकाम कामगारांना आता एक जबरदस्त सुविधा मिळाली आहे! नवीन योजनेतून 10 अत्यावश्यक वस्तूंचा संच दिला जातो. चला, या किटमध्ये काय काय आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघूया.

बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या 10 वस्तूंचा अत्यावश्यक संच आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याची सोपी मार्गदर्शिका.
अत्यावश्यक संचात समाविष्ट 10 वस्तू
- पत्र्याची पेटी (Galvanized Trunk)
- प्लास्टिकची चटई (Plastic Mat)
- धान्य साठवण कोठी – 25 किलो क्षमता
- धान्य साठवण कोठी – 22 किलो क्षमता
- बेडशीट
- चादर
- ब्लँकेट
- साखर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता 1 किलो)
- चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता 500 ग्रॅम)
- 18 लिटर वॉटर प्युरिफायर + 2 कॅन्डल
ऑनलाईन अर्ज कसा करावा – A to Z
- पहिले अत्यावश्यक संच वितरण या वेबसाईटवर जा. Link
- तिथे तुमचा BOCW कामगार नोंदणी क्रमांक टाका. तो क्रमांक शोधण्यासाठी लिंक वापरा.
- कामगार नोंदणी क्रमांक टाका आणि SEND OTP वर क्लिक करा
- OTP येईल, तो टाकून व्हेरिफाय करा
- तुमची सर्व वैयक्तिक माहिती आपोआप दाखवली जाईल
- खाली स्क्रोल करा आणि तुमच्या जवळच्या कॅम्पची निवड करा.
- आता अपॉइंटमेंट डेट वर क्लिक करा. उपलब्ध तारखा दिसतील. कोटा उपलब्ध असेल तर तुमची पसंतीची तारीख निवडा.
- तारीख निवडल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट वर क्लिक करा
निष्कर्ष
ही योजना बांधकाम कामगारांना आवश्यक वस्तूंची सुविधा देते. अर्ज प्रक्रिया सोपी व जलद आहे, फक्त काही पायऱ्या पाळा आणि तुमच्या किटसाठी अपॉइंटमेंट बुक करा.
योजनेच्या अधिक माहिती साठी GR वाचा
Latest post
- बांधकाम कामगारांसाठी नवीन अत्यावश्यक संच (Essential Kit) योजनाOctober 17, 2025
- पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी कशी करावी?October 16, 2025
- एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट…October 13, 2025
- हवामान अपडेट: १५-१८ ऑक्टोबरला वादळी पाऊसाचा अंदाजOctober 13, 2025
- ई-श्रम कार्ड कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना 2024December 05, 2024