formsolution logo
Form Solution

जात वैधता (Caste Validity) प्रमाणपत्र

जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे काय?

जात वैधता प्रमाणपत्र हे आपल्या जात प्रमाणपत्राची सत्यता सिद्ध करणारे एक महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. विविध शासकीय आणि शिक्षणाच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी याचा उपयोग होतो.

cast validityजात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचा उद्देश

जात वैधता प्रमाणपत्र विविध सरकारी योजना,

नोकरी, शिक्षण शिष्यवृत्ती, निवड प्रक्रिया,

तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असते.

यामुळे जात प्रमाणपत्रावर उल्लेख असलेल्या माहितीस वैधता प्राप्त होते.


जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोण अर्ज करू शकतो?

  1. ज्या व्यक्तींच्या नावावर जात प्रमाणपत्र आहे.
  2. जे अर्जदार महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत.
  3. ज्यांच्या पालकांकडे जात प्रमाणपत्र उपलब्ध आहे.
  4. ज्यांना सरकारी योजना, शिक्षण, किंवा नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे.


जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे (Documents Required)

  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. अर्जदाराचा जन्मदाखला
  3. अर्जदाराचा जातीचा दाखला (Caste Certificate)
  4.  अर्जदाराचे बोनाफाईड
  5. अर्जदाराचा टी.सी
  6. अर्जदाराचे प्राथमिक शाळेचा निर्गम उतारा
  7. पालकांचे प्रवेश निर्गम उतारा
  8. पालकांचा टी.सी झेरॉक्स
  9. पालकांचे जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  10. सख्खा भाऊ/चुलत भाऊ, बहिण, काका यांचे जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  11. एक जात पडताळणी प्रमाणपत्र Caste Validity (आपल्या आडनावाचे)
  12. फॉर्म नं. १५ महाविद्यालय सही शिक्का
  13. फॉर्म नं. १७ बॉण्ड
  14. फॉर्म नं. ३ फॅमिली ट्री (वंशावळ) बॉण्ड


अर्ज करण्यासाठी वेबसाईट

जात वैधता प्रमाणपत्रासाठी तुम्ही खालील अधिकृत पोर्टलवर अर्ज करू शकता:
https://ccvis.barti.in


आणखी माहिती साठी विडिओ पहा 👇👇👇