formsolution logo
Form Solution

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना स्कॉलरशिप

नमस्कार! आज आपण स्वधार योजना स्कॉलरशिप बद्दल चर्चा करू, जी विशेषतः अनुसूचित जाती आणि नव बौद्ध विद्यार्थ्यांसाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याची माहिती आपण येथे देत आहोत.


स्वाधार योजना स्कॉलरशिप

♦ स्वधार योजना काय आहे ?

स्वधार योजना ही विशेषतः अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि निवासाची मदत मिळते.

♦ अर्ज करण्यासाठी पात्रता
योजना कोणासाठी व योजनेच्या अटी:

  • विद्यार्थी अनु. जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
  • विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
  • वरील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना
  • पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचा नसावा.
  • उत्पन्न हे 250000 लाख पर्यंत असावे.
  • कॉलेज हे जिल्ह्या स्तरावर असावे.
  • विद्यार्थी तालुका स्तरावर रहिवासी असावा.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील

  • जात प्रमाणपत्र
  • महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा
  • आधार कार्ड
  • बँक खाते उघडले असल्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • शैक्षणिक गुणपत्रिका
  • महाविद्यालयाचे बोनाफाइड सर्टिफिकेट
  • निवास प्रमाणपत्र (खाजगी वस्ती गृहाचा पुरावा)

योजनेचा किती लाभ मिळेल

  • विद्यार्थ्यांना रु. 51000/- हजार दोन हप्त्यांमध्ये दिले जातात.
  • शैक्षणिक साहित्यासाठी
    • वैद्यकिय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अतिरिक्त रु. 5000/-
    • व इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रु. 2000/-


स्वधार योजना विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी आहे. याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या शिक्षणाची गती वाढवू शकता. तुम्हाला याबद्दल अधिक माहिती किंवा सहाय्य हवे असल्यास, आमच्या Telegram ग्रुपमध्ये सामील होऊ शकता.


अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ बघा